महान्यूज लाईव्ह टीम
केंद्रसरकारने कोरीनाबाधितांसाठी काही औषधांची शिफारस केली आहे.
निती आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्हि. के. पॉल यांनी याबाबत तज्ञांच्या सल्ल्याने दिशानिर्देश दिले आहेत. त्यानूसार ताप आल्यास पॅरॉसिटेमॉल आणि कफ असल्यास आयुश सीरप घ्यावे. कफ ३ दिवसापेक्षा जास्त असल्यास बुडेसोनाइडचा इन्हेलर घ्यावा आणि गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे.
जर दवाखान्यात अॅडमिट असाल आणि ऑक्सीजन लावाला लागला तर मेथिलप्रेडनिसोलोन आणि डेक्सामेथासोन ही औषधे देता येईल. हेपरिन हे औषधदेखील डॉक्टर देऊ शकतात.
घरी असलेल्या रुग्णाला रेमडेसीवीर दिले जाऊ नये. रुग्णालयात असलेल्या रुग्णाला आवश्यकतेनूसार रेमडेसीवीर देण्याचा सल्ला दिला गेलेला आहे.
कोणत्याही औषधाचा ‘ मिसयुज ‘ किंवा ‘ ओव्हरयुज ‘
करु नये असाही डॉ. व्हि. के. पॉल यांनी सल्ला दिला.