महान्यूज लाईव्ह टीम
दौंड तालुक्यातील सहजपूर येथे हायवेच्या बाजूला एक मृतदेह आढळला असून याबाबत माहिती असल्यास यवत पोलिसांना कळविण्याचे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.
हा मृतदेह ३५ ते ४० वर्षाच्या व्यक्तीचा असून डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून त्याचा खून केला आहे. या तरुणाचा खून याचठिकाणी झाला की दुसरीकडून मारुन आणून टाकले याचा तपास सुरू आहे.
काळे केस, काळ्या पांढऱ्या दाढी मिश्या, अंगात तपकिरी आणि पिवळ्या रंगाचा फुलशर्ट, निळ्या रंगाची जीन्स, राखाडी रंगाची अंडरवेअर, जवळ गुलाबी रंगाचा टॉवेल आणि काळ्या रंगाच्या चपला पडलेल्या आहेत.
सदर तरुणास कोणी ओळखत असेल तर ०२११९ २७४२३३ या यवत पोलिस स्टेशनच्या नंबरवर माहिती द्यावी. याखेरीज पोलीस निरीक्षक नारायण पवार – मो. ९७६३५२३८४९, सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे – मो. ९०१११२७७७०, पोलीस नाईक अजित काळे – ९८५००७६८९१, पोलीस नाईक प्रमोद गायकवाड – ९५४५८७८७९८ या नंबरवर फोन करून माहिती देता येईल.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.