इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ व २ येथे पतंजली योग समितीच्या वतीने जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.यावेळी समितीच्या सदस्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
जिल्हा परिषद शाळेत पतंजली योगाचा वर्ग सकाळी पहाटे पाच वाजता असतो.आज जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व सायरा आतार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी योग समितीच्या सदस्यांनी श्रमदान करून शालेय परिसर स्वच्छता केली. शालेय परिसरात नगराध्यक्षा व नगरपरिषदेच्या वतीने शालेय परिसरात चार एलईडी बसविण्यात आले आहेत. त्याबद्दल नगराध्यक्षांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठोंबरे सर यांनी मानले तसेच याप्रसंगी परबत सर यांनी स्वामी विवेकानंदांची प्रतिमा शाळेस भेट दिली याप्रसंगी पतंजली योग समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.