किशोर भोईटे,महान्यूज लाईव्ह
आदर्श गाव ग्रामपंचायत जाचकवस्ती (ता. इंदापुर) हद्दीतील अंतर्गत घाडगेवस्ती येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विक्रमसिंह निंबाळकर व गावातील जेष्ठ नागरिकांच्या उपस्थित करण्यात आले.
या भूमिपूजन प्रसंगी जाचकवस्तीचे सरपंच सुशील पवार, उपसरपंच प्रकाश नेवसे, ज्ञानदेव काळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रवीण माने, महेश निंबाळकर, तंटामुक्ति अध्यश रमेश जामदार, हनुमंत जामदार, विशाल काळे, शंकर पवार, संजय पवार, गणेश पवार, पुणे जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, हरीदास पवार,आनंता घाडगे उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व बारामती लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ यांनी केले. येणाऱ्या काळात सुद्धा जास्तीत जास्त निधी या गावात आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाचक वस्ती गावाने राज्यमंत्री भरणेंना प्रचंड मतांचे लिड दिल्यामुळे मंत्री भरणे यांचे विशेष लक्ष जाचकवस्ती गावावर आहे असे मत विक्रमसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.