महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
देशामध्ये अतिवेगाने ओमायक्रॉनचा प्रसार वाढू लागल्याने देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली असून राज्य सरकारे देखील वेगवेगळ्या उपाययोजना वेगाने आखत आहेत. यातच कोरोनाच्या लसीकरणाची मात्रा उपयोगी पडत असल्याने, तिसरा बूस्टर डोस तातडीने देण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. आज पासून कोरानाच्या तिसऱ्या बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले असून, हे रजिस्ट्रेशन स्वतः करावयाचे आहे.
आज म्हणजे 10 जानेवारीपासून कोरोनाचा तिसरा डोस दिला जाणार असून पात्र लोकांना हा डोस देण्यासाठी कोविन ॲप वर रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. यामध्ये फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आणि सहव्याधी म्हणजे कोमॉरबेडीटी असलेले ज्येष्ठ नागरिक तिसऱ्या डोस साठी पात्र असणार आहेत.
हा डोस घेताना डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही, मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांनी दुसरा डोस एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेतला असेल तेच लाभार्थी तिस-या डोस साठी पात्र असणार आहेत. त्याच प्रमाणे पहिले डोस ज्या कंपनीच्या लसीचे घेतले असतील, त्याच्या कंपनीची लस तिस-या डोस साठी घ्यावी लागणार आहे. हे लसीकरण नेहमीप्रमाणेच सरकारी रुग्णालयात मोफत केले जाणार असून आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स अथवा मतदार ओळखपत्र दाखवून हे डोस घेता येतील.
तुमच्या तिसऱ्या डोस ची तारीख चेक करा.
वरील लिंक वर क्लिक करा व मोबाईल क्रमांक टाका व पहा.👆https://selfregistration.cowin.gov.in/