बारामती तालुका पोलीस स्टेशनची पडाकेबाज कामगिरी!
लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरसाई माता मंदिरातील दागिणे चोरणा-या पती पत्नी व मेव्हणीस २४ तासाच्या आत केली अटक, महाराष्ट्रातील जवळपास २० ते २५ मंदिरामधील चोरीचे गुन्हे उघडकीस लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
प्रदीप जगदाळे : महान्यूज लाईव्ह
८ जानेवारी २०२२ रोजी रात्री १ ते ३ वाजताच्या दरम्यान बारामती तालुका पोलीस ठाणे हृद्दीतील शिर्सुफळ गावी असलेल्या शिरसाई मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने व मंदिरातील इतर वस्तू चोरीस गेल्याची घटना घडली. या बाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांनी तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व पोलीस ठाणतील अधिकारी, गुन्हे शोध पथकातील अमलदार, तसेच इतर पोलीस स्टाफसह घटनास्थळी जावून वेगवेगळी पथके तयार केली व शिर्सुफळ, मळद, कुरकुभ, दौंड, बारामती आसपासच्या परिसरातील जवळपास ६० ते ६५ सीसीटिव्ही कॅमे-याच्या फुटेजची पाहणी केली.
परंतू रात्रीची वेळ असल्याने आरोपींनी वापरलेल्या वाहनाचा नंबर समजण्यास अनेक अडचणी येत होत्या, परंतू पोलीस पथकाने वेगवेगळ्या कुलप्त्या वापरून आरोपींनी वापरलेल्या इको वाहन (क्रमांक. एम.एच १४ एफ एक्स ४५७६) चा नंबर मिळाला. त्याप्रमाणे पोलीस पथक सदर वाहनाच्या मालकापर्यंत पोहचले असता हे इको वाहन मालकाने त्याचे वाहन दिनांक ४ डिसेंबर २०२९ रोजी पिंपरी येथून चोरीस गेले असून त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे आरोपींचा शोध घेणे आणखी जिकरीचे झाले परंतु तपास पथकाला तांत्रिक बाबीवरून आरोपीत हे गोकुळ शिरगाव (ता. करविर, जि. कोल्हापूर) येथे असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने गोकुळ शिरगाव, (ता करविर, जि. कोल्हापूर) येथून आरोपी राहत असलेल्या घरातून सापळा आरोपींना ताब्यात घेतले.
यामध्ये १) शाहरूख राजु पठाण (वय २४ वर्षे रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव शिवतक्रारवाडी, निरा ता. पुरंदर जि. पुणे), (२) पुजा जयदेव मदनाळ (वय १९ वर्षे रा. रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव जुनाबिडी कुंभारी सोलापुर जि. सोलापुर) ३) अनिता गोविंद गजाकोश (वय १९ वर्षे रा. गोपाळ शिरगाव, नॅशनल हायवे ४ जवळ, जि. कोल्हापूर, मुळगाव- गोलघुमट शिवाजी चौक विजापुर जि. विजापुर राज्य कर्नाटक) अशा तिघांचा समावेश आहे.
पती पत्नी आणि मेहुणीचा चोरीचा फंडा
यातील आरोपी १ व २ हे पती-पत्नी असून आरोपी क्र.३ मेव्हणी आहे. सदर आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली देवून त्यांना शिरसाई माता मंदिरात चोरीसह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर जिल्हयातील वेगवेगळया जवळपास २० ते २४ मंदिरातील दागिने व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींना सदर गुन्हयात करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 15 जानेवारी 2022 पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. यापैकी शाहरुख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी समर्थ पोलीस ठाणे आणि फरासखाना पोलिस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
आरोपींकडून शिरसाई माता मंदिरातील चोरीस गेलेले सर्व दागिने व पितळी वस्तूसह महाराष्ट्रातील इतर मंदिरातून चोरी केलेले दागिने, वस्तू तसेच पिंपरी येथून चोरी केलेली इको वाहना (क. एम. एवं १४ एफ एक्स ४५७६) सह जवळपास १२ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अभिक्षक श्री मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस अमलदार नंदु जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक, अमोल नरुटे, मंगेश कांबळे, चालक बापू गावडे यांनी केलेली आहे.