शारदानगर च्या विद्यार्थ्यांची पुन्हा गगन भरारी!! या वर्षीदेखील मिळवली 13 लाख रुपयांची शिष्यवृत्ती!

प्रदीप जगदाळे : महान्यूज लाईव्ह

बारामती तालुक्यातील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती च्या शारदा नगर येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत या वर्षी देखील घवघवीत यश मिळवले. या वर्षी 34 विद्यार्थ्यांनी तब्बल बारा लाख 99 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवले आहे जी पुढील चार वर्ष या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी (नेशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम) एन एम एम एस ही परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये विद्यालयातील 14 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये प्रमाणे प्रत्येकी चार वर्षांमध्ये 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

त्यांना चार वर्षात एकूण 6 लाख 72 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, तर एन एम एम एस परीक्षेमध्ये पात्र झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या सारथी प्रकल्पातून 15 विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी दहा हजार रुपये प्रमाणे 4 वर्षात 40 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे अशी 6 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये इतर 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांना 27 हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे ट्रस्टचे प्रमुख श्री राजेंद्र पवार, विश्वस्त सौ सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे, गार्गी दत्ता, विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे व संतोष वाघ यांनी अभिनंदन केले.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago