शिरुर : महान्युज लाईव्ह
सार्वजनिक कार्यक्रमामध्ये चोरी करणाऱ्या सोन साखळी , पाकीट मार करणारा एकाला शिरुर पोलीसांनी पकडले असून अन्य पाच आरोपी फरारी आहेत.
या प्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ माउली कल्याण जाधव ( वय ४६ रा गांधीनगर बीड )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या गुन्हयात वापरलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे
याबाबत पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण येथे २५ डिसेंबर २०२१ रोजी मलठण ग्रामपंचायत समोर असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गर्दीचा गैरफायदा घेवुन काही अज्ञात चोरटयांनी रमेश सोन्याबापु गिते यांची ३ तोळे वजनाची गळयातील चेन, नरेंद्र निवृत्ती वाव्हळ यांची दिड तोळे वजनाची गळयातील चेन, शशिकांत बबन वाव्हळ यांचे ५०,००० रुपये रोख रक्कम व नानाभाऊ नामदेव फुलसुंदर यांचा मोबाईल असा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत रमेश सोन्याबापु गिते यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस स्टेशन मध्ये २७ डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हा घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता आरोपी हे करडया रंगाचे शेवरलेट कंपनीचे एन्जॉय कार मधुन आले होते . सीसीटीव्ही मधील फुटेज वरुन गुन्हा त्यांनीच केला असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हयाचे अनुषंगाने सीडीआर चे तांत्रीक विश्लेषण करुन आरोपीचा शोध घेतला असता ही टोळी बीड मधील असल्याचे दिसुन आल्याने लागलीच बीड जिल्हा येथे पोलीस पथक गेले होते
सदर गुन्हा करणारे सहा आरोपी पैकी आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कल्याण जाधव वय – ४६ वर्षे रा. गांधीनगर बीड ता. जि. बीड यास गुन्हयात वापरलेले शेवरलेट एन्जॉय एमएच २०ईई ०४३१ या वाहनासह गांधीनगर, बीड येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असून इतर ५ आरोपी अमोल पिटेकर, बंडु जाधव, लिंबाजी जाधव, संदीप जाधव, गणेश आगलावे हे फरार झाले आहेत.
अटक आरोपी ज्ञानेश्वर जाधव यास न्यायालयाने मंगळवार ११ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे . या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस नाईक जगताप, पोलीस अंमलदार साळवे यांचे पथकाने केली आसुन गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे करत आहेत.