‘छत्रपती’ मध्ये रमली जुन्या आठवणींची आनंदयात्रा ! माजी विद्यार्थ्यांनी राबवले अनेक विधायक उपक्रम !

डॉ. महेश घोळवे

महान्यूज लाईव्ह विशेष

तब्बल पंचवीस वर्षांपूर्वीचे मित्र आणि शिक्षक हे आपल्याला एकाच ठिकाणी भेटले तर?…. ती उत्कंठा काही औरच असते आणि त्यात सर्वांनी एकत्र येऊन जर काही सामाजिक उपक्रम केले तर अक्षरश: सोने पे सुहागाच म्हणावा लागेल. अशीच घटना इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे घडली. येथील छत्रपती हायस्कूलमध्ये 1997 च्या बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक एकत्र येत छानशा गेट-टुगेदरचे आयोजन केले होते. त्यातच अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. इतक्या वर्षानंतर एकत्र आल्यानंतर अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांना गहिवरून आले. जुन्या आठवणींना उजाळा मिळताच काहीजण अक्षरशः त्यात अगदीच गढून गेले.

इतिहासाची पाने डोळ्यासमोर फ्लॅशबॅक सारखी जात असतानाच तत्कालीन मुख्याध्यापकांना सुद्धा अश्रू अनावर झाले. अतिशय भावनिक तसेच उत्कंठा पूर्वक झालेल्या हा गेट-टुगेदर सर्वांच्याच स्मरणात राहील असेच भाव सर्वांच्या चेहर्‍यावर दिसत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गायकवाड यांनी केले. सर्व शिक्षकांचे आभार सतीश काटे यांनी मानले. विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थेला मायक्रो ओव्हन भेट स्वरूपात देण्यात आला. तसेच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी वयाचे वाटप करण्यात आले.

रसायनशास्त्र हा झालटे सरांचा विषय आणि त्याकाळी म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये एका एका वर्गाच्या आठवी नववीच्या सात – सात तुकडया असायचा. आपल्या मार्मिक शैलीमध्ये हे पूर्ण विश्व आणि पृथ्वी यांच्यातील माणसाचं अस्तित्व किती तिळमात्र आहे हे त्यांनी आपल्या शैलीमध्ये सर्वांना सांगितलं. तसेच जीवशास्त्र हा विषय वाजरींकर सरांचा आणि रसायनशास्त्र हा विषय झाल्टे सरांचा विषय, तर त्याकाळी त्यांनी विनोदाने असे म्हटले की, वाजरिंकर सरांनी विद्यार्थ्यांचा जीव (जीवशास्त्र) च घेतला आणि मी पूर्ण रस.. ( रसायनशास्त्र ) काढला.

COVID लोक डाऊनचा प्रदीर्घ कालावधीनंतरचा हा गेट-टुगेदर.. भीतीच्या वातावरणामुळे एकमेकांची भेट होणे जवळ जवळ बंद झाल होतं. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये.. घर आणि मित्र परिवार नातेवाईक यांच्या मध्ये कुठे ना कुठे कोरोना केसेस होत्या आणि त्याच्यामध्ये एकाकीपण माणसाला भेडसावत होतं.. त्यामुळे माणसांचे एकमेकांना भेटणं दुर्लभ होत.


या सर्व गोष्टींचा परिणाम मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी आणि शिक्षक वर्गालाही जाणवला.
कोरोना कालावधीमध्ये बरेच शिक्षक व विद्यार्थी मित्र गमावले गेले त्यांनाही एक श्रद्धांजली वाहण्यात आली.

चंद्रशेखर निंबाळकर सरांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, आज छत्रपतीचे विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात तर पोचलेच आहेत तसेच परदेशातही पोचले आहेत, भवानीनगर ते मुंबई , मुंबई ते अमेरिका कार्यरत असलेले विद्यार्थी आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो. सरपंच, उपसरपंच, बांधकाम व्यवसायिक, शासकीय अधिकारी, इंजिनीयर व आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी, तसेच शेती व्यवसायातही आपला वेगळा ठसा उमटवणारे काही विद्यार्थी पाहून आमची मान अभिमानाने उंच होते, असे मत निंबाळकर सर यांनी व्यक्त केले.

यावेळी विद्यार्थी व ग्रुपच्या वतीने बोलताना सतीश काटे यांनी या ग्रुपच्या काही कार्याविषयी सर्व गुरुजनांना माहिती दिली. ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आधार ग्लोबल फाऊंडेशन हे पर्यावरण विषयक उपक्रम राबवत असते. तसेच दिवंगत विद्यार्थी अमर थोरात यांच्या अपघाती मृत्यूवेळी ग्रुपने केलेली मोलाची मदत याचा उल्लेख करत सर्वांना एकत्र राहण्याचे आवाहन केले.

श्री कोळेकर सर यांचा गणित हा विषय. त्यामुळे त्यांच्या आठवणी अनेक विद्यार्थ्यांनी काढल्या आणि त्यांच्याकडून मिळालेल्या शिक्षा हा अनेकांच्या आठवणीत असल्यामुळे त्यांना आवर्जून दोन शब्द बोलून आपली प्रतिक्रिया द्यावी लागली. बदलत चाललेली शिक्षण पद्धती आणि सोशल मीडियाचा प्रभाव त्याच्यावर कोळेकर सर यांनी खंत व्यक्त केली. माणसाने ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी थांबले पाहिजे असे मत करोनाच्या पार्श्वभूमीवर सरांनी केले.

Maha News Live

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

7 hours ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

12 hours ago