डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या आठवणीतील माई ! अन् दोन महिन्यांत रस्ता पूर्ण झाला..!


संदीप मापारी पाटील, बुलढाणा

अनाथांची माय म्हणून जगभर ख्याती असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे दररोज कार्यक्रमानिमित्त भ्रमण व्हायचे. वय होत आलेलं, हाडे कमजोर झालेली, तरी मनात धगधगती उमेद घेऊन त्या फिरत राहायच्या.

असेच एकदा सिंदखेडराजा मतदार संघातून त्यांचा (जालना नाव्हा सिंदखेडराजा) जाण्याचा योग आला. माई व गाडीचा चालक रस्ता मार्गक्रमण करत होते एवढ्यात अचानक जोरदार झटका बसला. खड्डा होता. रस्त्यात चालक कुशलतेने गाडी चालवत होता, पण खड्ड्याने घात केला.

गाडी जोरात आदळली. माई जोरात वेदनेने विव्हळल्या “ अग आईई गं माईच्या कंबरेची व मनकेची हाडे गंभीर पणे दुखावली गेली. “जगभर जिच्या पुत्राची ख्याती, ते महाराज शिवछत्रपती शिवराय याचं आजोळ असणाऱ्या मातृतीर्थाची एवढी दयनीय अवस्था? याठिकाणचा प्रतिनिधी कोण आहे.?

विधानसभेत नव्यानेच निवडून आलेले डॉ. शशिकांत खेडेकर यांना फोन लावला गेला. “ अरे काय रे बाळा, मातृतीर्थाचा तू लोकप्रतिनिधी एवढ्या थोर अस्मिता असलेल्या मतदार संघाचा तू प्रतिनिधी अन काय ही रस्त्याची अवस्था? माई कळवळून बोलत होत्या, वेदना असाह्य होत होत्या. माईचे शब्द मोजकेच होते, पण शेलके होते. आमदार साहेबांनी माईंची माफी मागितली.

डॉ. शशिकांत खेडेकर फक्त एवढेच बोलले ‘ माई मी नव्यानेच या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी झालो आहे. माई म्हणाल्या, हो बाळा ! मला माहित आहे, तू आई जिजाऊचा लेक आहेस, अन बाळासाहेबांचा सच्चा सैनिक आहेस, तू हा रस्ता लवकरात लवकर तयार कर आणि जनतेचा त्रास कमी कर.

तेंव्हा आमदार डॉ. शशिकांत खेडेकर बोलले ‘ माई मला फक्त दोन महिन्यांचा वेळ द्या. त्याच्या आतच हा रस्ता गुळगुळीत तयार करून देईल. माई बोलल्या “ बघ बरं, बाळा तू कोणाला शब्द देत आहे, त्याचा विचार कर असा पुनरुच्चार माईंनी केला.

तेंव्हा डॉ. शशिकांत खेडेकर यांनी माई मी विचार पूर्वक शब्द दिला आहे असे सांगितले. त्यानंतर आमदार खेडेकर यांनी एक महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण केले.
माईला शब्द दिला होता. रस्ता पूर्ण झाला. माईला पूर्ण झालेल्या रस्ता पाहण्यास यावे अशी विनंती केली.

माईने मान्य केले व पुन्हा कार्यक्रमानिमित्त याच रस्त्यावरून जाण्याचा त्यांचा योग आला. ज्या ठिकाणी गाडी आदळली होती, त्या ठिकाणी आल्यावर त्यांना मागचा प्रसंग आठवला आणि शब्द दिलेले आमदार शशिकांत खेडेकर आठवले. माईचे अंतःकरण भरून आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याशी संपर्क केला.

माई आनंदी होत्या. अंतःकरण गदगद झाले होते. त्या गहिवरल्या शब्दात बोलल्या, “बाळा मी पुन्हा त्याच रस्त्याने जात आहे. पण आज तक्रार नाही. तुझा अभिमान वाटतोय. कौतुक वाटतंय, तू मला दिलेला शब्द पूर्ण केला.”

आमदार डॉ. शशिकांत खेडेकरांनी त्याच ठिकाणी येऊन माईंची भेट घेतली. माई गाडीतून उतरल्या, त्यांनी डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. “ आतापर्यंत मला शब्द देणारे बरेच पाहिले. परंतु शब्द पाळणारा तू एकमेव आहेस. तू आयुष्यात खूप मोठा होणार बाळा!

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

19 hours ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

2 days ago