महान्यूज लाईव्ह टीम
जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसींबाबतच्या विधानामुळे तणाव वाढताना दिसतो आहे. आव्हाड यांच्या व्टिटने यात भर पडली आहे.
या व्टिटमध्ये ते म्हणतात ‘उद्या माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा……. जय भीम!
ओबीसींवर भरवसा नाही, अशा अर्थाच्या त्यांच्या वक्तव्याने त्यांच्यावर अगोदरच टिका होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी ‘ जे बोललेत त्यांनाच विचारा.’ असा काहीसा नाराजीचा सूर लावल्यासारखे जाणवले. यावरुन महाविकास आघाडीलाही त्यांचे समर्थन करणे अवघड होत असल्याचे दिसते आहे.
त्यात त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन त्यांच्या विरोधात मोर्चेबंदीचाही प्रयत्न होताना दिसत आहे.