सोमेश्वरनगर : महान्यूज लाईव्ह


आपल्याला जर एखाद्या गाडीची डिस्ट्रिब्युटर शिप अथवा डिलर शीप पाहीजे असेल तर ऑनलाईन माहीती घेताना पुरेपुर काळजी घ्या अन्यथा आपण फसवले जावु शकता ..
सोमेश्वरनगर येथील काॅंप्युटर ईंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी ऋत्विक गणेश आळंदीकर याने असाच एक घोटाळा उघड करुन खोटी माहीती व पैशाची मागणी करणाराला चांगलेच सुनावले असुन सबंधीत कंपनीच्या आवाहनानुसार त्यांच्याकडे ईमेलद्वारे या घोटाळेबाजाची संपूर्ण माहीती दिली आहे .


ऋत्विक याने सुमारे १९ मिनिटे या घोटाळेबाजाला वेगवेगळे प्रश्न करुन माहीती घेतली व नंतर शेवटच्या दोन तीन मिनिटात असे सुनावले कि त्याची बोलतीच बंद झाली . वेगवेगळ्या वेबसाईट वर ऑनलाईन घोटाळ्याबद्द्ल माहीती येत असते मात्र घोटाळेबाज इतके हुशार आहेत कि कोव्हीडचे कारण सांगुन भेटायला नकार देतात. मात्र ऑनलाईन गाड्याची डिस्ट्रीब्युटर शीप, डिलरशीपची बनावट पत्रे तयार करुन पैसे भरायला लावतात व गायब होतात. त्यामुळे ग्राहकानी वेबसाईट खरी आहे का याची देखील तपासणी करणे गरजेचे आहे. त्या घोटाळेबाजाशी ऋत्विकने केलेली त्याची बोलती बंद करणारी चर्चा आवर्जुन ऐका. शेवटच्या तीन चार मिनिटात त्याचा पोलखोल झालेला दिसला …

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago