दौलतराव पिसाळ
वाई : महान्यूज लाईव्ह
पुण्याच्या कोथरुड परिसरात गुन्हेगारी क्षेत्रात दहशत निर्माण केलेला, अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेला फरारी आरोपी वाईत असल्याची माहिती वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना खास खबऱ्यामार्फत समजताच त्यांनी आपल्या डिबी पथकाला याची माहिती देऊन वाईच्या एसटी स्टँडसह
दत्तनगर परिसरात सापळा लावुन अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या या पथकातील
पोलिस कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेऊन सिनेस्टाईल पाठलाग करुन अखेर वाईच्या डिबीचा हिसका दाखवुन अटक केल्याने वाईतील गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे ..या गुन्हेगाराचा वाईत कुठल्या टोळीशी लागे बांधे आहेत का ? याचा कसून तपास डिबी पथक करीत आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुणे शहरातील कुणाल हेमंत धर्में ( वय २१, राहणार, सतुरदरा, कोथरुड ) हा या परिसरात दहशत माजवत विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. त्याच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसापुर्वी त्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून कोथरुड पोलिसांना चकवा देऊन अटके पासून
बचाव करण्यासाठी त्याने वाई गाठल्याची माहिती भिमा कोरेगाव येथे बंदोबस्तावर असणारे वाईचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना खास खबऱ्यामार्फत मिळाल्याने त्यांनी तातडीने याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांना देऊन त्याला पकडण्याची रितसर परवानगी घेऊन लगेच डिबी पथकातील सहाय्यक फौजदार विजय शिर्के, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, महिला पोलिस सोनाली माने – दुदुस्कर यांना आरोपी सापडलाच पाहिजे असे आदेश दिले . या पथकातील पोलिसांनी वेषांतर करुन त्याचे मोबाईल लोकेशन काढले असता ते वाईचे एसटी स्टँड आणी दत्तनगर असे येत असल्याने या दोन्हीही परिसरात पथकाने खाजगी गाडीचा वापर करुन सकाळपासून सापळा लावला होता. हा आरोपी नेहमीच स्वत: जवळ पिस्तुल आणी कोयता अशी खतरनाक हत्यारांचा वापर करत असल्यामुळे या पथकाने तब्बल पाच तास अथक परिश्रम घेऊन अखेर या खतरनाक आरोपीच्या मुसक्या आवळुन त्याला ताब्यात घेऊन कोथरुड पोलिसांच्या स्वाधीन केला डिबीच्या या धडाकेबाज चतुर
कारवाईचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी कौतुक केले आहे .