महान्यूज लाईव्ह टीम
मु्स्लिम महिलांचे फोटो ऑनलाईन प्लॅटफार्मवर टाकून त्यांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा धक्कादायक प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. गिटहर्ब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बुली बाई या नावाने ग्रुप तयार करण्यात आला होता . या ग्रुपने आता ‘ सुली डिल्स ‘ या नावाने हा ऑनलाईन लिलाव मांडला आहे.
या महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून त्यांच्या नकळत घेण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वैदी आणि एआयएमआयएम चे नेते आणि खासदार औवेसुद्दिन ओवेसी यांनी या बाबीचा व्टिटरवरून निषेध केला असून केंद्र सरकारला गंभीरपणे या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी उपाध्याय यांनी व्टिटरवर दिलेल्या माहितीनूसार सदर अकाऊंट गिटहर्बने बंद केले आहे. पोलिस आणि सीईआरटी ची टीम याबाबत तपास करीत आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांनी हा विषय मुंबई पोलिस कमीशनर यांच्याकडेही नेला असून त्यांना या विषयात चौकशी करण्याची विनंती केली आहे. मुंबई सायबर पोलिसही या प्रकाराची चौकशी करीत आहेत.
दिल्ली पोलिसांनी याबाबत आपण चौकशी करत असल्याचे म्हणले आहे. याबाबत गिटहर्ब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला रितसर पत्र दिले आहे. परंतू त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही.
एका महिला पत्रकारासह अनेक मुस्लिम महिलांचे यावर अपलोड केले गेले आहेत.
यापुर्वीही असा प्रकार घडला असून या सुली डिल्सविरोधात दिल्ली आणि उत्तर प्रदेशात पोलिसात तक्रारी नोंदविलेल्या आहेत.