बारामती : महान्यूज लाईव्ह
हरियाणा येथील एम डी युनिव्हर्सिटी येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर पिंच्याक सीलाट स्पर्धेत बारामती येथील आर्याने कडवी झुंज देत सिल्वर पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत रेगू ,माका, सिंगा, प्रिंटेन, सब-ज्युनियर, ज्युनियर इत्यादी गट सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारतातून २७ राज्यातील १४०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, महाराष्ट्र संघात आर्या यांची निवड बारामतीतून रेगू गटात झाली होती. मुलींचे प्रतिनिधीत्व करत असताना आर्याला अतिशय कडवी झुंज द्यावी लागली. मणिपूर, हरियाणा, मध्येप्रदेश इत्यादी राज्याच्या खेळाडूचा पराभव करत आपले नाव सिल्व्हर पदकावर कोरत महाराष्ट्रातील सर्व मुलांना अभिमान वाटावा अशी फाईट तिने केली.
आर्या हिने बारामतीत योध्दा स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी मास्टर साहेबराव ओहोळ ( इंटरनॅशनल कोच & रेफरी ) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टीस केली आहे.
आर्या 14 वर्षे वयोगटातील रेगू प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या मेहनतीचे फळ मिळवले आहे.
इंडियन पिंच्याक सीलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले सर व सेक्रेटरी इकबाल सर यांनी मेडल देऊन तिला सन्मानित केले. अतिशय कमी वयात नॅशनल खेळणारी उत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्राच्या आर्या हिचा सन्मान युनिव्हर्सिटीचे स्पोर्ट्स डायरेक्टर यांनी केला.