महान्यूज लाईव्ह विषेश
‘ सूर नवा ध्यास नवा ‘ गाजविलेला छोटा ‘ मॉनिटर ‘ आता एका मालिकेतून आपल्या अभिनयाची झलक दाखविणार आहे.
सूर नाव ध्यास नाव या गाण्यांच्या स्पर्धेत बाल कलाकार हर्षद नायबळने सगळ्यांचेच मन मोहून घेतले होते. त्याचे गाणे, त्याचे पाठांतर, त्याची डॉयलॉग डिलिव्हरी, त्याचा स्टेजवरचा सहज वावर याने प्रेक्षक त्याच्यावर फारच खूश होते.
आता तोच हर्षद नायबळ स्टार प्रवाहवर १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ‘ पिंकीचा विजय असो ‘ या नव्या मालिकेत पिंकी या मुख्य पात्राच्या भावाची भूमिका साकारणार आहे.
दिप्या हे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून पिंकी आणि तिची लहान बहिण निरीला नेहमी साथ देणारा असा हा त्यांचा लाडका भाऊ आहे.
हर्षदला गाण्याची आवड आहेच. पण या मालिकेच्या निमित्ताने त्याची अभिनयाची आवडही जोपासली जाणार आहे.
सेटवरही तो सगळ्यांचा लाडका असून सतत सगळ्यांचे मनोरंजन करत असतो.