महान्यूज लाईव्ह टीम
उत्तर प्रदेशात जसजशी निवडणूक जवळ येते आहे, केंद्रीय तपास यंत्रणा एकदम कामाला लागल्या आहेत. मात्र आयकर विभागाच्या ताज्या छाप्यात सापडलेली रोख रक्कम पाहून सर्वसामान्यांचे डोळेच पांढरे होण्याची वेळ आली आहे.
कानपूर येथे अत्तराचे व्यापारी पीयूष जैन यांच्या घरावर आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात घबाड हाती लागले आहे. पीयूष जैन यांच्याकडून तब्बल १६० कोटी रुपये रोख स्वरुपात मिळाले आहेत. गेले चोवीस तास सुरु असलेला तपास अद्याप संपलेला नाही.
नोटा मोजण्यासाठी मशीन आणि बॅंक कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. बेनामी कंपन्याच्या नावाने बिले बनवून जीएसटी चोरी करण्याचा पीयूष जैन यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या घरातून २०० पेक्षा जास्त खोटे इन्हाईस आणि ई – वे बील मिळाले आहेत. छाप्यात मिळालेली रक्कम ठेवण्यासाठी मोठे मोठे बॉक्स मागविले जात आहेत.
आता या विषयावरून भाजपा आणि समाजवादी पार्टीत जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे.