फलटण : महान्यूज लाईव्ह
शीतल अहिवळे
सहकार क्षेत्रातील मानबिंदू, सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्था फलटण, संचलित ‘श्रीराम बाजार’ या संस्थेच्या चेअरमनपदी श्री जितेंद्र पवार व व्हा. चेअरमनपदी श्री दिलीपसिंह भोसले ( भैय्यासाहेब ) यांची एक मताने निवड झाली. सहा. निबंधक सुनिल धायगुडे यांनी शासकीय अधिकारी म्हणून काम पाहिले.
श्रीराम बाझार फलटण येथे निवडुन आलेल्या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये सहा. निबंधक सुनिल धायगुडे यांच्या देखरेखीखाली सन २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी चेअरमनपदी श्री. जितेंद्र पवार आणि व्हा. चेअरमनपदी महाराजा उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री दिलीपसिंह भोसले ( भैय्यासाहेब ) यांची एक मताने निवड झाली.
यावेळी व्हा. चेअरमन दिलीपसिंह भोसले म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने काम करणाऱ्या या संस्थेमध्ये कुठलेही राजकारण न आणता विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि खासदार रणजितदादा निंबाळकर, तालुक्यातील मान्यवर नेते तसेच हि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. संस्थेचे कामकाज सर्वाना बरोबर घेऊन पारदर्शकपणे करण्याची ग्वाही देतो असे सांगून व्हा. चेअरमनपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
यावेळी जयकुमार शिंदे, मारुती गावडे आणि जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मत व्यक्त केली. बेडकिहाळ सर म्हणाले, वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी सर्वानी एकजुटीने राहून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चेअरमन जितेंद्र पवार यांनी चेअरमनपदी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करताना, सर्वांच्या सहकार्याने संस्थेला प्रगती पथावर नेण्याचे आश्वासन दिले. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल सहा. निबंधक धायगुडेसाहेब यांचे आभार मानले.