फायनान्सच्या ऑफिस मध्ये पेट्रोल ओतून घेऊन युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

इंदापूर : इंडस फायनान्स कडून घेतलेल्या वाहनास ९० हजारापेक्षा जास्त व्याज लावल्याच्या कारणावरुन युवकाने वैतागून फायनान्सच्या इंदापूर येथील ऑफिस मध्ये स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

महादेव वाघमोडे असे या पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या यवकाचं नाव असून तो इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावचा रहिवासी आहे.ही घटना बुधवारी दुपारी घडली.

महादेव वाघमोडे यांनी थेट कंपनीकडून गाडी न घेता कंपनीद्वारे घेतलेल्या मूळ मालकाकडून गाडी विकत घेतली आहे. महादेव वाघमोडे यांच्या म्हणण्यानुसार कोविड कालावधीमध्ये बँकेने तुमच्याकडून कोणत्याही हप्त्याचे व्याज घेतले जाणार नाही असे सांगितले होते. तरीही सदर इंडस फायनान्सने नव्वद हजारापेक्षा जास्त व्याज लावले असून माझा प्रपंच पूर्ण उध्वस्त झाला आहे, त्यामुळे अंगावरती पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करत असल्याचे महादेव वाघमोडे यांनी सांगितले.

सदर घडलेल्या सर्व घटनेस इंडस फायनान्स चे कर्मचारी आणि मॅनेजर जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही यावेळी वाघमोडे यांनी केली. यावेळी इंडस बँकेच्या व्यवस्थापकांनी मात्र महादेव वाघमोडे यांनी आमच्या कडून कर्ज घेतले नसून त्यांनी परस्पर कर्जदारांची व्यवहार केला आहे आणि ती थर्ड पार्टी असल्याचे सांगून या व्यवहाराबाबत माहिती दिली.

कोविड मुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना फायनान्स कंपन्याकडून भरमसाठ व्याज आकारले जात आहे. यामुळेच अशा घटना घडत आहेत.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

2 days ago