महान्यूज लाईव्ह टीम
मानवाने निर्माण केलेल्या एका वस्तूने म्हणजेच यानाने जवळपास सुर्याला स्पर्श केल्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. ही घटना २८ एप्रिल रोजीच घडली असली तरी काल नासाने ती मंगळवारी जाहीर केली आहे.
पार्कर प्रोब हे या यानाचे नाव असून नासाने २०१८ मध्ये हे यान सुर्याच्या दिशेने सोडले होते. ५ लाख किमी प्रतीतास वेगाने हे यान सुर्याच्या दिशेने जात राहिले. याच प्रवासात सुर्याच्या चुंबकीय क्षेत्राचाही अनुभव या यानाने घतला. हे चुंबकीय क्षेत्र सूर्याच्या अगदी जवळ आहे. आता हे यान सुर्याच्या पृष्ठभागाच्या जवळ फिरत असून यापासून सुर्याबद्दल आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
सुर्याच्या इतक्या जवळ जाणारे हे पहिलेच मानवनिर्मित्त यान असल्याने ही घटना ऐतिहासिक असल्याचे मानले जात आहे.