मुंबई : महान्यूज लाईव्ह
मुंबईतील धारावी येथे ओमीक्रॉनचा एक रुग्ण सापडल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
यापुर्वीही धारावीमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला होता. येथील कोरोनावर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. आता अती संक्रमित असलेला ओमिक्रॉन धारावीत पाय पसरू लागल्याचे पाहून सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
धारावीत सापडलेला रुग्ण हा टांझानियातून आलेला असल्याचे समजते. याअगोदर दिल्लीत सापडलेला रुग्णही टांझानियातून आलेलेा होता. त्यामुळे टांझानियातून ओमीक्रॉनचा प्रसार जगभर होतो आहे की काय याची शंका आता येऊ लागली आहे.
या रुग्णला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.