मुंबई : महान्यूज लाईव्ह
इंग्लडमध्ये कोरोनाचा नवा प्रकार ओमिक्रॉन वेगाने पसरताना दिसतो आहे. गुरुवारी येथे २४९ नवे ओमिक्रॉन कोरोना रुग्ण सापडले. आता येथील एकुण ओमिक्रॉन कोरोना रुग्णांची संख्या ८१७ झाली आहे.
ओमिक्रॉन ज्या वेगाने पसरतो आहे, ते बघता पुढील महिनाभरात इंग्लडमधील एकुण कोराना रुग्णांपैकी ५० टक्के ओमिक्रॉन कोरानाचे रुग्ण असतील अशी शक्यता येथील तज्ञ व्यक्त करीत आहेत.
ओमिक्रॉन सर्वाधिक संक्रमिक आहे, त्यामुळे त्याचा बिमोड करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरजही येथील तज्ञ बोलून दाखवत आहेत.
भारतात अद्याप ओमिक्रॉनचा फारसा प्रसार झालेला नसला तरी आपण सावध राहण्याची गरज आहे.