भोर : महान्यूज लाईव्ह
माणिक पवार
दोघांमधील असलेला कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. डाव, चपळता, निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळासाठी सुदृढ शरीरयष्टी सोबतच चपळ आणि तेज बुद्धिमत्तेची गरज असते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी नसरापूर येथे भरविण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन महिला कुस्ती स्पर्धेच्या वेळी केले.
देशभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांनी सक्षम बनावे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी नेहमी तत्पर रहावे. हा हेतू साध्य करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा खेळ भारतात तसेच इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. भारतातील कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. कुस्तीचे ओलिंपिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे अशी माहिती शितोळे यांनी यावेळी उपस्थिताना दिली.
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत ‘पुणे जिल्हा क्रीडा विभाग समिती’ आणि “पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे” शंकराव भेलके महाविद्यालय नसरापुर ” यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील बारा महाविद्यालयातील ३९ महिला कुस्तीपटूनी सहभाग नोंदवला.
या आंतर महाविद्यालयीन महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व नामांकित कुस्तीपटू शिवनाना कोंडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा क्रिडा विभाग समितीचे उपसचिव डॉ. सुहास बहिरट,नसरापूरचे माजी सरपंच हनुमंत कदम , प्रा. डॉ. तुषार शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी जि. प.सदस्य शिवनाना कोंडे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राला कुस्तीची महान परंपरा आहे.या खेळाकडे मुलींनी मोठ्या संख्येने वळून आपली खेळाडू वृत्ती जोपासावी असे प्रतिपादन त्यांनी केले .
विविध गटातील विजेते
५० किलो वजनी गट
साक्षी भिलारे ( ए.टी. कॉलेज, भोर ) प्रथम तर श्रद्धा सोनकर (शंकरराव भेलके कॉलेज, नसरापूर ) द्वितीय क्रमांक.५३ किलो वजन गट : श्रद्धा भोर (आर. जे. एस. पी. एम. भोसरी ) प्रथम क्रमांक, मनाली गायकवाड ( एम.एस. के. सी. सोमेश्वर नगर) द्वितीय क्रमांक. ५५ किलो वजन गट : प्रतीक्षा सोनकर (ए. टी. कॉलेज भोर ) प्रथम क्रमांक ,प्रतीक्षा चव्हाण ( सिटी बोरा कॉलेज शिरूर ) द्वितीय क्रमांक. ५७ किलो वजन गट : सायली कुरकुटे ( बी. जे. कॉलेज, आळे ) प्रथम क्रमांक, वैष्णवी शेळके ( सिटी बोरा कॉलेज, शिरूर ) द्वितीय क्रमांक. ५९ किलो वजन गट : पूजा राजवाडे ( अमृतेश्वर महाविद्यालय विंझर ) प्रथम क्रमांक, विश्वविजया जगताप ( एस. सी. महाविद्यालय, इंदापूर ) द्वितीय क्रमांक. ६२ किलो वजन गट : आकांक्षा नलावडे ( अमृतेश्वर महाविद्यालय, विंझर ) प्रथम क्रमांक, आदिती नलावडे ( बी. जे . महाविद्यालय ,आळे ) द्वितीय क्रमांक. ६५ किलो वजन गट : दिपाली सोनी ( आर. जे. एस. पी. एम. भोसरी ) प्रथम क्रमांक, ऋतिका मानकर ( ए. टी. महाविद्यालय भोर ) द्वितीय क्रमांक. ६८ किलो वजन गट : मोनिका चव्हाण ( बी. जे. महाविद्यालय ) प्रथम क्रमांक , अंकिता सांचे ( अमृतेश्वर महाविद्यालय विंझर ) द्वितीय क्रमांक. ७२ किलो वजन गट : कोमल शितोळे ( सिटी बोरा महाविद्यालय शिरूर ) प्रथम क्रमांक, पुनम घाडगे ( बी.जे.सी. आळे ) द्वितीय क्रमांक ७६ किलो वजन गट : साक्षी शेलार ( अमृतेश्वर महाविद्यालय, विंझर ) प्रथम क्रमांक , शुभांगी गोसवी ( एम.एस.के.महाविद्यालय सोमेश्वर नगर ) द्वितीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पौर्णिमा कारळे , प्रा. डॉ. जे.डी. शेवते, प्रा. पी. वाय. गायकवाड, प्रा. दयानंद जाधवर, डॉ. सचिन घाडगे, डॉ. राजेंद्र सरोदे, प्रा. संदीप लांडगे, प्रा. आर.जी. डांगे, प्रा. प्राजक्ता कापरे, विकास ताकवले, गोविंद राठोड यांनी केले. तर प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालक प्रा. पौर्णिमा काळे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्पर्धेचे निवेदन प्रा.संदीप लांडगे यांनी केले.
शालेय विद्यार्थिनीची कुस्ती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील युवतींनी मोठी गर्दी केली होती.