महान्यूज टीम
आज अफगाणिस्थानातून ११० हिंदू आणि शिखांचा ग्रुप भारतात परत आला आहे. हे चार्टर्ड विमान काबुलहुन निघून नवी दिल्ली विमानतळावर पोचले आहे.
यामध्ये भारतींयांसोबत अफगाणी नागरिकांचाही समावेश आहे. या लोकांनी येताना ३ गुरु ग्रंथ साहेब सोबत आणले आहेत, तसेच रामायण, महाभारत, भगवतगीतासारखे हिंदू धर्मग्रंथहीसोबत आणले आहेत. अफगाणिस्थानातील ऐतिहासिक गुरुद्वारातील हे गुरु ग्रंथ साहेब आहेत तर ५ व्या शतकातील आसमाई मंदिरामध्ये असलेले हिंदू धर्मग्रंथ परत आणण्यात आलेले आहेत.
इंडियन वर्ल्ड फोरम या संघटनेने म्हणले आहे की, यातील अफगाण नागरिकांची ते सोबती फौंडेशच्या मदतीने सर्व व्यवस्था करणार आहेत.
आतापर्यंत अफगाणिस्थानातून ५६५ लोकांना ऑगस्ट महिन्यापासून भारतात आणण्यात आलेले आहे.
जे अजूनही अफगाणिस्थानमध्ये आहेत, त्यांच्याशी संपर्क ठेवून असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हणले आहे.