मुंबई : महान्यूज लाईव्ह
तुमच्या लग्नाचा व्हिडिओ आहे का ? त्याची किंमत किती असेल ? तुमच्यासाठी हा प्रश्न काहीसा वेडगळपणा असला तरी, सध्या चर्चेत असलेल्या एका लग्नाच्या व्हिडिओची किंमत ८० कोटीपर्यंत गेल्याची चर्चा आहे.
हे लग्न कुणाच म्हणून काय विचारता मंडळी ? दुसऱ्या कुणाचं, आपल्या कॅतरिना आणि विकीचं हो…! सध्या या लग्नाबद्दल खुप चर्चा सुरू आहे. कोण येणार, कोण नाही येणार याचा खल सुरु आहे. यात आणखी एक बातमी आली आहे ती लग्नाच्या व्हिडिओची…!
या लग्नात कुणाही पाहुण्याला त्याच्या मोबाईलवरून व्हिडिओ शुटींग करण्यास अथवा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. या शाही लग्नसोहळ्याचे चित्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर्सना बोलावण्यात आलेले आहे.
आपल्या लग्नाचा व्हिडिओ काढणाऱ्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात. येथे या लग्नाचे शुटींग करण्यासाठी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये प्रचंड स्पर्धा लागली होती. या स्पर्धेत अॅमझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मने बाजी मारली. अॅमेझॉनने या लग्नाचे शुटींग करण्याचे हक्क ८० कोटींना विकत घेतल्याची चर्चा आहे.
आता पुढचं वाचा ! या लग्नाच्या संगीत सोहळ्यासाठी गाणी गाणाऱ्या शंकर एहसान लॉय यांना मानधनही अॅमेझॉन प्राईमनेच दिले आहे. या सोहळ्यासाठी फोटोग्राफरही अॅमेझॉनकडूनच आले होते.