महान्यूज लाईव्ह टीम
ओमिक्रॉन कोरानाने परत एकदा जगाची चिंता वाढवलेली असली तरी, सध्यातरी महाराष्ट्रासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात एकही ओमिक्रॉन कोरानाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही.
राज्यातील आतापर्यंत ओमिक्रॉन कोरानाची लागण झालेले १० रुग्ण सापडले आहेत. परंतू ८ व ९ डिसेंबर या दोन दिवसात एकही नवा ओमिक्रॉन रुग्ण सापडलेला नाही.
१ ते ९ डिसेंबर या काळात राज्यात हाय रिस्क असलेल्या देशातून ८ हजार ८४६ प्रवासी आलेले आहेत. तसेच इतर देशातून ४४ हजार ५८ प्रवासी आलेले आहेत. एकुण या ९ दिवसात ५२ हजार ९०४ जण परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत.
हाय रिक्स देशातून आलेल्या सर्वच्या सर्व प्रवाशांची आरपीसीआर करण्यात आली आहे. तर इतर देशांतून आलेल्या प्रवाशांपैकी १ हजार ९९ जणांची ही चाचणी करण्यात आलेली आहे.
एकुण १६ प्रवाशांची चाचणी कोराना पॉझिटिव्ह आली. मात्र जीनोमिक सिक्वेन्सिंगच्या अहवालाखेरीज यापैकी किती जणांना ओमिक्रॉन कोराना आहे सांगता येत नाही.
विमानतळावरून एकुण ८० जणांचे नमूने जीनोमीक सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आलेले आहेत. यापैकी ५५ जणांचे रिपोर्ट अद्याप यायचे आहेत.