कर्जत : महान्यूज लाईव्ह
मागील वर्षी कर्जत येथील एका ज्येष्ठ नागरिकासह आणखी एका घरात 11 मार्च 2021 रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडी प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे कर्जत पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. पोलिसांनी अतिशय सूत्रबद्ध तपास करत नऊ महिन्यांपूर्वी झालेली घरफोडी उघडकीस आणून तिघाजणांना जेरबंद केले.
विशाल नारायण दळवी, (वय ३१ वर्ष, धंदा व्यापार रा.शहाजी नगर, कर्जत ता. कर्जत जि.अ.नगर) यांच्या घरी व आणखी एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरी अज्ञात आरोपींनी 11 मार्च 2021 या दिवशी रात्रीच्या वेळी घरफोडी केली होती. सदर बाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. कर्जत पोलिसांनी कसोशीने तपास करून आरोपी निष्पन्न केले.
त्यामधील आरोपी विकी विश्वास काळे (वय २३ वर्ष रा. सांगळे वस्ती, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर),
नंदया पायथ्या पवार (वय २० वर्ष रा.साळंदी रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या दोघांना 20 मार्च 2021 रोजी अटक केले होते व यातील तिसरा आरोपी प्रदिप ज्ञानदेव भोसले (वय २० वर्ष रा.साळंदी रोड, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) हा फरार होता.
या आरोपीस गोपनीय माहिती वरून श्रीगोंदा येथून अटक करण्यात आली. न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली. ही कारवाई नगरची पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, विभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक सतीश गावित, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खरे, सलीम शेख, गोवर्धन कदम यांच्या पथकाने केली
सदरची कारवाई-
मा.पोलीस अधिक्षक सो
श्री.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,
अपर पोलीस अधिक्षक
श्री सौरभकुमार अग्रवाल,
उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग
श्री आण्णासाहेब जाधव
यांचे मार्गदर्शनाखाली
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर श्याम जाधव, सुनिल खैरे, सलीम शेख, गोवर्धन कदम, यांनी केली आहे.