माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर : पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून राजगड पोलीस ठाण्याच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनात दस्तुरखुद्द अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील या अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण केले. राजगड हद्दीतील ७६ तक्रारीचे निराकरण करण्यात आले.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारीचे निराकरण नसरापुर ( ता. भोर ) येथील जानकीराम मंगल कार्यालयात निराकरण करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, निखिल मगदूम, नितीन खामगळ, या अधिकाऱ्यांनी तक्रारीचे निराकरण केले. यावेळी हवालदार संजय ढावरे, अजित माने, भगीरथ घुले, सतीश चव्हाण, जगताप, महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम, नाईक गणेश लडकत, अश्विनी मोरे आदी पोलीस कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.
राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील प्राप्त झालेल्या तक्रारीसंबंधित अर्जदार, गैरअर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारींवर निराकरण करण्यात आले. पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, बीट अंमलदार व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तक्रार निवारण दिनात तक्रारींचा ताबडतोब निपटारा करण्यात तक्रारदारांनी प्रतिसाद दिला.
नागरिकांनी पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच राज्य सरकार व राजगड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केले होते. त्या संबंधित तक्रारीचे तक्रारदारांचे निराकरण करण्यात आले तक्रार निवारण करताना उपस्थित अधिकाऱ्यांनी विनाविलंब निराकरण केले तसेच ज्या प्रकरणात कारवाई करण्याची गरज आहे त्या प्रकरणातील संबंधितांना समजपत्र देऊन कारवाई केली.
धनंजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी
‘राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 76 तक्रारदारांचे तक्रार निवारण करण्यात आले आहे. आगामी काळात होणाऱ्या तक्रार निवारण मोहिमेत तक्रारदारांनी सहभाग घ्यावा, जेणेकरून आपपसातील वादविवाद मिटून कायदा – सुव्यवस्था अबाधित राहील’