महान्यूज लाईव्ह टीम
एक व्हिडिओ सध्या खुप चर्चेत आहे. असही घडू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण हे खरेच घडले आहे. एका पॅसेंजर रेल्वे चालवत असलेल्या चालकाला अचानक दही खाण्याची इच्छा झाली. मग काय ? आली लहर , केला कहर ! चालक महाराजांनी चक्क मध्ये वाटेतच रेल्वे थांबवली, आणि आपल्या सहाय्यकाला दही खरेदी करण्यासाठी पाठवले. दह्याची खरेदी झाल्यावरच रेल्वे पुढे निघाली.
आता असा प्रकार कोठे घडू शकतो ? अर्थातच आपल्या शेजारी देशात, पाकिस्तानात. जिथे कोणतेही नियम, कायदे नावाचा प्रकारच शिल्लक राहिलेला नाही. येथील लाहोरजवळ ही घटना घडलेली आहे.
आता हा व्हिडिओ समोर आल्यावर या ड्रायव्हर आणि त्याच्या सहाय्यकाला निलंबित करण्यात आले आहे. हा व्हिडिओ आता सगळीकडे पाहिला जात असून पाकिस्तानच्या या स्थितीची भारतीय मजा घेत आहेत.