राजकीय

पुरंदरेंच्या अस्थी रायगडावर ? दोघे जण पोलीसांच्या ताब्यात ! संभाजी ब्रिगेडचा दावा !

महाड : महान्यूज लाईव्ह

पुरंदरे यांच्या अस्थी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी ठेवण्याचा प्रयत्न आम्ही उधळून लावला आहे, असे संभाजी ब्रिगेडने म्हणले आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी राज्यातील गडकिल्यावर विसर्जित करण्याची घोषणा मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला होता.

मात्र पुण्यातील काही व्यक्तींनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुरंदरे यांच्या अस्थी ठेवण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा दावा करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडने ही माहिती दिली. महाड तालुका पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी किल्ले रायगडावर घेऊन दोघे जण आले होते. हे दोघेही पुण्यातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या दोघांनी राखसदृश्य वस्तू आणि पुस्तकाची पूजा करताना छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर दिसून आले. या दोघांना किल्ल्यावर काहींनी विरोध केला.

त्यानंतर या घटनेची माहिती महाड तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस किल्ले रायगडावर पोहोचले. त्यांनी संबंधित दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या दोघांनीही जेवणाच्या डब्यात अस्थी आणल्या होत्या, अशीही माहिती समजते. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील वस्तू आणि इतर मुद्देमाल ताब्यात घेतला. तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणाची नोंद महाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. महाड तालुका पोलीस निरीक्षक देशमुख यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, या घटनेशी संबंधित ट्विट राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. रायगडाचे पावित्र्य जपा, नवीन वाद महाराष्ट्रात निर्माण करू नका, असे आवाहन आव्हाड यांनी व्टिटच्या माध्यमातून केले आहे.

tdadmin

Recent Posts

दौंड तालुक्यात तीन वाजेपर्यंत अवघं ३७ टक्के मतदान! अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात…

3 hours ago

आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्वीट! पहा व्हिडिओ!

बारामती : महान्यूज लाईव्ह इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ…

8 hours ago