महान्यूज लाईव्ह विशेष
घनश्याम केळकर
” अहंकारी सरकारला झुकवून आम्ही परत चाललो आहोत. ” या शब्दात शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी आंदोलन स्थगितीची घोषणा केली. हे आंदोलन संपलेले नाही तर स्थगित करण्यात आले आहे. १५ जानेवारीला संयुक्त किसान मोर्चाची बैठक होईल. त्यानंतर पुढील रणनीती ठरविली जाईल, असेही ते म्हणाले.
पण सध्यातरी दिल्लीच्या सीमेवर ३७८ दिवस चाललेले शेतकऱ्यांचे आंदोलन आज अखेर संपुष्टात आलेले आहे. सिंधू बॉर्डरवरून शेतकरी आता तंबू काढून टाकून परत जाण्यासाठी निघालेले दिसत आहेत.