मुंबई : महान्यूज लाईव्ह
दिल्लीच्या रोहिणी कोर्टात सकाळी १०.३० वाजता एका लॅपटॉप बॅगेत स्फोट झाल्याची घटना पुढे आली आहे.
सुरुवातीला लॅपटॉपच्या बॅटरीमुळे हा स्फोट झाल्याचे मानले जात होते. परंतू आता मात्र हा स्फोट टिफिन बॉम्बचा असल्याची माहिती मिळते आहे. या बॅगेत एक डबा ठेवण्यात आला होता. त्या डब्याचा स्फोट झाला आहे.
हा स्फोट १०२ नंबरच्या न्यायालयाच्या दालनात झालेला आहे. या घटनेचा व्हिडिओ जो समोर आला आहे, त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी या बॅगेकडे धावत जाताना दिसतो आहे. या स्फोटाची माहिती मिळाल्यावर न्यायालयाचे सर्व कामकाज थांबविण्यात आले. सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. दिल्ली पोलिस पुढील तपास करीत आहेत.