पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे, पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक सिद्धिविनायक ग्रुपचे राजेश साकला यांच्यावर महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅट अॅक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सदस्यांची सोसायटी स्थापन करून त्याचे हस्तांतरण सोसायटीकडे करणे बंधनकारक असतानाही तब्बल १२ वर्षे हस्तांतरण न केल्याने सिद्धीविनायक प्रॉपर्टीच्या भागीदारांविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजेश कुमार नवपतलाल साकला आणि वृषभ राजेश साकला या दोघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी बाबुराव धायगुडे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सिद्धिविनायक प्रॉपर्टीने कोंढवा खुर्द स.नं.२२ येथे २००८ मध्ये प्रकल्प पूर्ण केला. त्यानंतर सोसायटीची स्थापनाही केली. मात्र प्रकल्पातील जमीन, इमारतीचे सोसायटीकडे हस्तांतरण केले नाही. सोसायटीने अनेक वेळा विनंती करूनदेखील तब्बल १२ वर्षे हस्तांतरण न केल्याने शेवटी सोसायटीच्या वतीने बाबुराव धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.