मुंबई : महान्यूज लाईव्ह
गुगलने २०२१ मध्ये भारतातील लोकांनी सर्वात जास्त शोध कशाचा घेतला याची यादी जाहीर केली आहे. हे सगळे वर्ष कोवीडच्या छायेत गेले. त्यामुळे यावर त्याचीच छाया आहे. परंतू यात काही गोष्टी मोठ्या मनोरंजक आहेत.
भारतीयांच्या बदलत्या आवडी निवडींवरही यातून प्रकाश पडतो आहे.
यावर्षी चित्रपटगृहे बंदच राहिली, त्यामुळे या क्षेत्रात फारशा घडामोडी घडल्या नाहीत. परंतू वर्षाअखेरीस आलेला ” जय भीम ” हा चित्रपटच सर्वाधिक शोध घेतलेल्या चित्रपटांच्या यादीत सगळ्यात पहिला आहे.
त्यानंतर शेरशाह ( हिंदी), राधे, बेलबॉटम, Eternals, Master ( तमिळ ), शुरवंशी ( हिंदी ), गॉडझिला v/s किंग ( इंग्रजी), दृश्यम २ ( हिंदी ) आणि भुज : द प्राइड ऑफ इंडिया ( हिंदी) या चित्रपटांचा समावेश आहे.
गुगलवरून कोणत्या व्यक्तींची माहिती मिळवली याची यादीतील काही नावे आपल्याला आश्चर्यचकित करणारी आहेत.
पहिले नाव नीरज चोपडा हे अपेक्षित आहे, पण दुसरे नाव आर्यन खान मात्र अनपेक्षित आहे. अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल आर्यन खानला अटक झाली. शाहरुख खान याचा मुलगा असल्याने जवळपास दिड महिना या प्रकरणावर जोरदार चर्चा देशभरात झाली. त्याच्याच परिणाम म्हणून आर्यन खान सर्वाधिक शोध घेतलेल्या लोकांमध्ये दुसऱ्या नंबरला जाऊन पोचला.
यानंतरची नावे शेहनाज गिल, राज कुंद्रा, एलन मस्क, विक्की कौशल, पीवी सिंधू, बजरंग पुनिया, सुशील कुमार आणि नताशा दलाल यांची नावे आहेत. आश्चर्याची गोष्ट ही आहे की यात कोणीही राजकारणी नाही. एक उद्योजक आहे तो भारताबाहेरील आहे. राज कुंद्राचे नाव यामध्ये आहे, पण तो त्याच्या वेगळ्याच उद्योगामुळे चर्चेत आलेला आहे.
कोणत्या खाद्यपदार्थांबाबत भारतीयांनी शोध घेतला आहे, याचे उत्तरही गंमतीशीर आहे.
भारतीयांच्या बदलत्या खाण्याच्या सवयी येथे दिसतात. येथे पहिल्या नंबरवर Enoki मशरूम आहे, पण दुसऱ्या नंबरवर मोदक आहे. मोदक या खास मराठी पदार्थाची माहिती सगळ्या भारतातील लोकांना हवी आहे. मोदक बनविणाऱ्यांसाठी ही खुप चांगली बातमी आहे.
यानंतर आहे, मीठी मटर मलाई, पालक, चिकन सुप या पदार्थांची नावे. यानंतर या यादीत पोर्न स्टार mariti कशी काय आली आहे हे काही कळत नाही.
यानंतरची lasagnas, cokies या पदार्थांचा शोध घेतला गेला आहे. शेवटची दोन नावे आहेत, मटर पनीर आणि kada.
यातील काही खाद्यपदार्थांची नावे आपल्याला अपरिचित असतील. तर काही नेहमी जेवणाच्या टेबलवरील आहेत. यातही भारतीयांच्या खाण्याच्या सवयी कशा बदलत आहेत, याचे प्रतिबिंब दिसते आहे.