मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यात सगळ्यात प्रथम जो ओमीक्रॉन कोरोना रुग्ण सापडला, तो आता कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त झाला आहे. २२ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून डोंबिवली येथे आलेला ३३ वर्षीय व्यक्ती ओमीक्रॉन कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते.
काल त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले.
त्याला पुढील सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे. याखेरीज नायजेरियातून आलेल्या चार कोरोनाग्रस्त रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल अद्याप आले नसल्याने त्यांना झालेला कोरोना हा ओमीक्रॉन प्रकारातील आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.