इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सुरेश मिसाळ
समाजातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव व दीनदुबळ्यांना
राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या शिबिराचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवाभावी भावनेतून प्रयत्न करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून बावडा गावामध्ये राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी गारटकर बोलत होते.
यावेळी बोलताना गारटकर म्हणाले,समाजातील गोरगरीब, उपेक्षित लोक,निराधार, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे. गोरगरीब सर्वसामान्य जनता व वयोवृद्ध तसेच दिव्यांगांना खऱ्या अर्थानं आपल्या मदतीची गरज असते,आपण केलेल्या छोट्याशा मदतीमुळे त्यांच्या जीवनाला थोडा का होईना पण आधार मिळत असतो. या भूमिकेतूनच आपण खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये अशा शिबिरांचे आयोजन केले आहे. सामाजिक जिवनामध्ये वावरत असताना एकमेकांना आनंद द्यायचा आणि आनंद घ्यायचा या वृत्तीतून गरजूंना मदत केल्यामुळे आपल्याला सुद्धा निश्चितपणे समाधान मिळत असते,त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवाभावी भावनेतून योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावा,असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, बावडा सोसायटीचे विजय घोगरे, बाळासाहेब करगळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,अजित टिळेकर, तुकाराम घोगरे, विद्यासागर घोगरे, रविराज घोगरे, नवनाथ रुपनवर,पिंपरी चे सरपंच श्रीकांत बोडके, अभिजीत घोगरे, संग्रामसिंह पाटील, रणजीत घोगरे, जालिंदर गायकवाड, गिरवीचे सरपंच पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासो क्षिरसागर, श्रीकांत दंडवते, नरसिंहपूरचे विठ्ठल देशमुख, चाकाटीचे सरपंच संजय रुपनवर, अमोलराजे मोहिते, नागेश गायकवाड, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा अश्विनी कुर्डे, सुनिल पालवे, महावीर जगताप, विक्रांत घोगरे, विक्रम घोगरे, जिग्नेश कांबळे, पांडुरंग कांबळे, सतीश कांबळे, बाळासाहेब भोसले किशोर शिंदे, अस्लम मुलाणी, जालिंदर भिसे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.