घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
गेले काही दिवस मराठी चित्रपट आणि टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींचे व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत होते. चेहऱ्याला रंगरंगोटी केल्याशिवाय कुणालाही दर्शन न देणाऱ्या प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडीत, सोनाली खरे आणि आदिती शारंगधर या अभिनेत्री आपल्या ओठावरील लिपस्टिक पुसताना दिसल्या. त्यांचे हे लिपस्टिक पुसतानाचे व्हिडिओ सोशल मिडियावर फिरायला लागले. यामागचे कारण काही लोकांना कळत नव्हते. ते कारण आता पुढे आलेले आहे.
तेजस्विनी पंडीतने आता ” अनुराधा ” या संजय जाधव यांच्या नव्याने येणाऱ्या वेबसिरिजचे पहिले पोस्टर आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून प्रदर्शित केले. या पोस्टरमध्ये असलेली लिपस्टिक कांडी आणी kill you soon व अनुराधा ,नवी वेबसिरिज यावरून या रहस्यावरचा पडदा उठलेला आहे.
अनुराधा ही संजय जाधव यांची नवी वेबसिरिज प्लॅनेट या मराठी अॅपवरून प्रसारित होणार आहे. या वेबसिरिजच्या प्रचारासाठी हा फंडा वापरण्यात आला होता.
पोस्टरवरून ही वेबसिरिज थ्रिलर असावी असे वाटते आहे. या वेबसिरिजच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या कल्पनेचेदेखील सोशल मिडियावर कौतुक होते आहे.