शिरूर : महान्युज लाईव्ह
शाळेत असताना एकत्र काढलेल्या आठवणी…शिक्षकांचा खाल्लेला मार..आलेले कटू- गोड आठवणी याने सर्वच विद्यार्थी भावूक झाले होते. निमित्त होते माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे..!
पिंपळसुटी ( ता. शिरूर ) येथील सन १९९६-९७ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा नुकताच स्नेहमेळावा पार पडला.यावेळी तब्बल २५ वर्षानंतर सर्वच मित्र एकत्र आले होते.
तब्बल २५ वर्षानंतर प्रथमच सर्व विद्यार्थी एकमेकांना पाहत होते.या वेळी भेटलेल्या मैत्रिणी एकमेकांची आवर्जून विचारपूस करत होते.तर विद्यार्थी ही प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करत होते. शाळा सोडल्यानंतर अनेकजण विविध क्षेत्रात काम करत असताना येथे भेटल्यानंतर मात्र सारे विसरून जुन्या आठवणीत हरवून गेले होते.यावेळी जीवनात आलेले अनुभव शेअर करताना प्रत्येकजण भावूक झाला होता.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे भाऊसाहेब सावंत, रवींद्र भोंडवे, लालासाहेब नागवडे, अनिल गायकवाड, रावसाहेब दिवेकर या शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजारसमितीचे विजेंद्र गद्रे, उद्योजक शाम काळे यांनी केले.तर आभार माजी सरपंच सतीश चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल पिंपळसुटी चे सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षक उपस्थित होते.