शिरूर : महान्युज लाईव्ह
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागलेले…ही बाब समजताच भाजपचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी पुणे ते सातारा रातोरात अधिकाऱ्यांसह धाव घेतली पाठपुरावा केला अन् तब्बल ३६६ विद्यार्थ्यांचे दाखले ही मिळवून दिले.
याबाबत सविस्तर असे की, शिरूर तालुक्यातील पारोडी ग्रामपंचायत सदस्य बजरंग सातकर व आपासो मावळे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे व त्याबाबत विलंब होत असल्याची माहिती भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांना दिली होती.
जयेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्वतः जात पडताळणी कार्यालय येथे धाव घेतली. यावेळी उशिरापर्यंत कार्यालयाबाहेर थांबलेल्या विद्यार्थी व पालकांना विश्वासात घेत नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची हमी दिली. याबाबत बोलताना शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, काही पालकांना विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत राहण्याची व्यवस्था केली, त्यानंतर जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेऊन सातारा येथे धाव घेतली. यावेळी सर्व प्रक्रिया पूर्ण करून जवळपास ३६६ विद्यार्थ्यांचे अर्ज पुणे कार्यालयातून देण्यात आले. यानंतर शिंदे यांनी पाठपुरावा करून तीन दिवसाची मुदतवाढ मिळविण्यासाठी प्रयत्न केले व अखेर तीन दिवसांची मुदतवाढ ही देण्यात आली.
या सर्व प्रक्रियेत डॉ.प्रवीण देवरे, संतोष जाधव यांच्यासह अधिकारी वर्गाने रात्रभर जागून काम केले. दरम्यान मोलाचे सहकार्य करणारे खुशाल गायकवाड यांचा पालकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यापुढे ही विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी सांगितले.