इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर येथे अनेक वर्षापासून योग साधना द्वारे लोकांच्या निरोगी जीवनासाठी प्रयत्न केला जात असून योगाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण अशाप्रकारचे महत्त्व आहे. अलीकडील वाढता ताणतणाव तसेच कोरोना पार्श्वभूमीवर योगास असणारे महत्त्व लक्षात घेऊन इंदापूरमध्ये भव्य असे योगभवनाची उभारणी केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समिती, संजीवन योग सेवा संस्था इंदापूर, शहा ब्रदर्स ॲन्ड कंपनी इंदापूर यांच्या वतीने इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनमध्ये सुरू असलेल्या अखंड निःशुल्क योग प्राणायाम स्थाई केंद्राचा १७ वा वर्धापन दिन सोमवारी ( दि.०६ डिसेंबर ) रोजी पहाटे योग साधनेद्वारा साजरा करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘ पतंजली योग समितीचे मार्गदर्शक आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून इंदापूर येथे अनेक वर्षापासून योग साधनेद्वारे लोकांच्या निरोगी जीवनासाठी प्रयत्न केला जात आहे. योगाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण प्रकारचे महत्त्व आहे.
यावेळी दत्तात्रय अनपट आणि पतंजली योग समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.