बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या जिल्हा परिषद सदस्य व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांचा विवाह येथे 28 डिसेंबर रोजी मुंबईत बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव एडवोकेट निहार यांच्याशी होणार आहे. सध्या या विवाहासाठी पाटील कुटुंबाची जय्यत तयारी सुरू असून हर्षवर्धन पाटील सध्या या विवाहाच्या निमित्ताने व्यस्त आहेत. त्यांनी नुकतीच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यावेळी राज्यात युतीचे सरकार सत्तेवर होते. हा अपघात झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची महामार्गाची संकल्पना आखली होती. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीतून हा महामार्ग अस्तित्वात आला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेकांना बिंदुमाधव ठाकरे आजही स्मरणात आहेत.

त्याच बिंदुमाधव ठाकरे यांचे निहार हे चिरंजीव आहेत. गेल्या काही दिवसांपासून या विवाहाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

मात्र पाटील कुटुंबाच्या वतीने या विवाहासाठी कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता, मात्र सध्या हर्षवर्धन पाटील यामध्ये व्यस्त असून या विवाहाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोजक्या निमंत्रक कारमध्ये हा विवाह होणार असून 28 डिसेंबर रोजी हा विवाह होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका असून मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे चुलत काका आहेत, तर अंकिता पाटील या माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. तसेच त्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या संचालिका देखील आहेत.