बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडी जेजुरी नजिक अपघात झाल्याने ईनोवा गाडीचे नुकसान झाले. मात्र किरण गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
बारामती जेजुरी रस्त्यावर हा अपघात झाला. खळद नजीक शाळेतील विद्यार्थी समोरून आल्याने पुढे असलेल्या वाहनांच्या चालकाने ब्रेक मारल्यामुळे किरण गुजर यांची गाडी समोरच्या गाडीच्या पाठीमागे जाऊन धडकली.
ही गाडी जोरात धडकल्याने ईनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र गाडीच्या एअर बॅग वेळेत उघडले गेलेने किरण गुजर यांना दुखापत झाली नाही. यावेळी गाडीमध्ये किरण गुजर यांच्यासह अमोल गावडे हेही होते. दरम्यान किरण गुजर यांनी सांगितले की, मी सुखरूप आहे. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी आम्ही येत असताना खळदनजीक विद्यार्थी पुढे आल्याने पुढील गाडीने ब्रेक टाकल्याने हा अपघात घडला.