बारामती : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वीच बारामती शहर पोलीस ठाण्यातील एक हवालदार लाचखोरीत सापडलेला असताना आणि कालच लोणीकाळभोर येथील वाहतूक शाखेच्या पोलिस शिपाई लाचखोरीचा सापडला असतानाच आज बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एक पोलीस हवालदार लाचखोरीत सापडला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईत पोलीस हवालदार लाचखोरीत सापडला. विशेष म्हणजे या हवालदाराचा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते आणि तो यापूर्वी न्यायालयामध्ये पोलीस मुख्यालयातून कार्यरत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
माणिक गदादे असे या हवालदाराचे नाव असून तो बारामती च्या सत्र न्यायालयात गार्ड म्हणून कार्यरत होता. मांढरदेव येथून एक जीप पोलिसांनी ताब्यात घेतली होती. त्या गाडीचा दरोड्याच्या गुन्ह्यात वापर झाल्याचे सांगितले. ही स्कॉर्पिओ सोडून देण्यासाठी या गदादे याने पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती वीस हजार रुपयांवर तडजोड झाली.
यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कार्यालय गाठले. यावेळी लातूर प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी मध्ये वीस हजार रुपयांची लाच गदादे याने मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सापळा रचला नंतर मात्र गदादे यांना कारवाईचा संशय आला त्यामुळे त्यांनी लाच घेण्याचे टाळले. आज माणिक गदादे याला ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.