पुणे : महान्यूज लाईव्ह
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी बिनविरोध निवड झाली. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता उरली आहे.
दिलीप वळसे-पाटील हे जिल्हा बँकेवर ती गेली 31 वर्ष सलग संचालक आहेत. जिल्हा बँकेच्या निवड पंचवार्षिक निवडणुकीत होणारे ते पहिले संचालक ठरले असून, राज्यातीलही ते पहिलेच मंत्री ठरले आहेत
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून येत्या 22 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 6 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती त्यांच्या मतदारसंघातून केवळ दिलीप वळसे पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून येणार याची केवळ औपचारिकता उरली आहे. 7 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होती.
दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राज्यातील मंत्र्यांपैकी दत्तात्रय भरणे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी अर्ज दाखल केले आहेत.