मुंबई : महान्यूज लाईव्ह
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशानंतर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतील ओबीसी जागांवरील निवडणूकांना स्थगिती देण्यात आली होती. २१ डिसेंबरला होणाऱ्या १०५ नगरपंचायतींमधील ओबीसी प्रभागातील निवडणूकीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. तसेच भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीतील ओबीसी जागांवरील निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली आहे.
ओबीसी जागा वगळता इतर जागांवर निवडणूक होणार आहे.
राज्यात आगामी काळात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांमध्येही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होणार आहे.