मुंबई : महान्यूज लाईव्ह
सीबीएसईच्या पहिल्या सत्राच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परिक्षा २२ डिसेंबरपर्यंत संपणार आहेत. या परिक्षा सुरू असतानाच सीबीएसई बोर्डांने नव्याने परिपत्रक पाठवले आहे. यामध्ये ओएमआर शीट भरण्याबाबत केलेल्या बदलांची माहिती आहे.
हे बदल ७ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. विद्यार्थ्यांनी सतर्क राहून या नवीन पद्धतीनूसार ओएमआर शीट भरणे गरजेचे आहे.
परिक्षा सुरू असताना मध्येच हे बदल केले गेले आहेत. शिक्षकांना याबाबत येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
यामध्ये ओएमआर शीटमध्ये पर्याय भरताना विद्यार्थ्यांनी कॅपिटल A,B,C,D या अक्षरांचा वापर करणे गरजेचे आहे. a,b,c,d या अक्षरांचा वापर टाळावा.
वरील बदलांमुळे शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासताना अडचणी येणार नाहीत. त्यामुळे कमीत कमी वेळेत उत्तरपत्रिका तपासून वेळेत निकाल जाहीर करता येईल.