शिरूर : महान्युज लाईव्ह
तब्बल दोन वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत चिमुकल्या मुलांचा किलबिलाट दिसून आला.विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
बाभूळसर बुद्रूक(ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शासनाच्या नियमानुसार पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले.
कोरोनाच्या रोगामुळे गेली दोन वर्ष शासनाने निर्बंध घातल्याने पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग बंद होते.मात्र संसर्ग प्रमाण कमी झाल्याने शासनाने नियम घालून चौथी पर्यंतच्या वर्गांना परवानगी देण्यात आल्याने शाळा सुरू करण्यात आली.
यावेळी विद्यार्थांना गावच्या उपसरपंच दिपाली महेंद्र नागवडे आणि शाळा व्यस्थापन समिती उपाध्यक्ष महेंद्र नागवडे यांच्या वतीने चिमुकल्यांना शालोयोपगी वस्तू, खाऊ आणि गुलाबाचे फुल मान्यवरांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी हनुमंत पाटोळे,गणेश मचाले,भाऊसो थोरात, शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष नागवडे, ग्रामपंचायत सदस्य सुनील देशवंत, मोहिनी रणदिवे, सोमनाथ नागवडे, प्रगतशील शेतकरी संतोष टेकवडे, महेंद्र रणदिवे, शाळा व्यस्थापन समिती सदस्य प्रदीप नागवडे, निलेश नागवडे, विकास राऊत, नवनाथ नागवडे, महेंद्र शिरोळे, संतोष कैलास नागवडे, सचिन जाधव तसेच मुख्याध्यापक धने व सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.