मुंबई : महान्यूज लाईव्ह
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी मुंबई विमानतळावर रोखण्यात आले. ती मस्कतला निघाली होती. तिला विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. काही वेळानंतर तिला कारवाई पूर्ण करून घरी परत पाठविण्यात आले.
ईडीने जॅकलिनविरोधात २०० कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी लूक आऊट सर्क्यूलर जारी केले आहे. त्यामुळे विमानतळावरील इमिग्रेशन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ती रोखले.
१० डिसेंबरला रियाधमध्ये सलमान खानच्या दबंग टूरमध्ये ती सहभागी होणार होती. काही दिवसांपूर्वीच दीववरून ती ‘ राम सेतू ‘ चित्रपटाचे शूटींग आटपून परतली होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिची दोनदा चौकशी केली होती. तेव्हा तिने आपल्याला या फसवणुकीत गुंतविण्यात आल्याचे म्हणले होते.