महान्यूज मनोरंजन टिम
एकापाठोपाठ एक मराठी अभिनेत्री जाहीरपणे आपल्या ओठांवरचे लिपस्ट्रिक पुसताना दिसत आहेत. यामागचे कारण अजूनही समोर आलेले नाही.
याची सुरवात दोन दिवसांपूर्वी तेजस्विनी पंडीतने केली. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती आपल्या ओठांवरचे लिपस्टीक पुसताना आणि ” बॅन लिपस्टीक, मला लिपस्टीकचा रंग नको ” असे म्हणताना दिसली.
त्यानंतर सोनाली खरे, आदिती सारंगधर यांचाही असाच व्हिडिओ समोर आला. काल प्राजक्ता माळीचाही व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती ओठांवरचे लिपस्टिक पूसत ” मला लिपस्टिकचा रंग नको ” असे म्हणताना दिसली.
आता ‘ बॅन लिपस्टिक ‘ प्रकरण काय आहे याचा अद्याप उलगडा झालेला नाही. चेहऱ्यावर रंगरंगोटी केल्याशिवाय आणि अर्थातच ओठांवर लिपस्टिक लावल्याशिवाय घराबाहेरही न पडणाऱ्या, आणि कॅमेऱ्यालाही तोंड न दाखविणाऱ्या या अभिनेत्रींना अचानक लिपस्टिक का नकोसे झाले आहे?
यामध्ये काही सामाजिक कारण आहे की, एखाद्या चित्रपटाचे, मालिकेचे, प्रोजेक्टचे प्रमोशन आहे हे काही अद्याप कळालेले नाही. ते आज- उद्या नक्कीच कळेल.