महाड : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड किल्ला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा कारणास्तव रायगड किल्ला, रायगड रोपवे व परिसर पर्यटकांसाठी 3 ते ७ डिसेंबर या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे . पोलीस अधीक्षक जनसंपर्क कार्यालयाकडून यासंदर्भातील प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सात डिसेंबरला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रायगड किल्ल्यावरती येणार आहेत . राष्ट्रपतींच्या दौऱ्यदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने रायगड किल्ला 3 ते 7 डिसेंबर 2021 या पाच दिवसांच्या कालावधीत करता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे . रायगड किल्ल्या बरोबरच रायगडवर जाण्यासाठी सुविधा पुरवणारा रोपवे देखील पर्यटकांसाठी या कालावधीत बंद राहणार आहे. रायगड किल्ल्या बरोबरच रायगडच्या आजूबाजूच्या परिसरात देखील पर्यटकांसाठी प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे .रायगड किल्ल्यावरती जाण्यासाठी महाड, नाते खिंड ते पाचाड तसेच माणगाव इथून जाणारा माणगाव, घेरोशी वाडी मार्गे पाचाड हे दोन रस्ते पर्यटक वापरत असतात. राष्ट्रपतीच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव या दोन रस्त्यांवरील वाहतूक देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये रायगडावर येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून आगाऊ सूचना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे पर्यटकांना मात्र रायगड पासून पाच दिवस दूर राहावे लागणार आहे.